बागेला फुल कमी आहे
बागेला फुल कमी आहे तर फुलावरील कोणते औषध मारावे:
- फुलांच्या कोणत्याही औषधाने फुल निघत नाही किंवा निघाले तरी टिकत नाही...
- त्यासाठी काडीत स्टोरेज आवश्यक आहे...
- फुलावरील फवारणीला हजार रुपये घालविण्यापेक्षा हजार रुपयांचे खालील औषधे वापर करा*
- - झाडाची मुळी पहिले चेक करा..मुळी नसेल तर पहिले मुळीसाठी औषध सोडावे.
- - त्यानंतर पाने चेक करा..पाने लांब जास्त होत असतील, म्हणजे झाडाची ताकत फुले काढण्यापेक्षा पानांमध्ये जास्त जात असेल तर बागेचे पाणी काही प्रमाणात कमी करा व वरतून 00/52/34- 3 ग्राम + बोरॉन 1 ग्राम प्रति लिटर चा स्प्रे घ्यावा.
- - झाडाची ताकत कमी पडत असेल तर ड्रिपमधून 00/52/34: 5 किलो प्रति एकर प्रति आठवडा 2-3 वेळा सोडा.
- - झाडाला पाणी योग्य प्रमाणात ठेवा. त्यात कमी जास्त पण होऊ देऊ नका. फुल निघतच नसेल तर गरज वाटत असेल तर एक गल्ली सोडून एक असे फ्लो पाणी भरून बघा.
- वरील पर्यायांनी फुल निघण्यास मदत नक्की होईल.
- फॉस्फरिक ऍसिड ज्यावेळी जमीन कडक झालेली असेल, मुळी कमी अपटेक करत असेल तर वापरू शकता..!.
- व फुलावरील कोणते औषध म्हणाल तर तो फुकटचा खर्च असतो ...कोणत्याही औषधाने फुल निघत असेल तर सरसगट सर्व बागांना या औषधांनी फुल निघायला पाहिजे पण तसे होत नाही याला कारण काही झाडांत मुळात ताकत असते कि जिथे फुल निघणारच असते पण शेतकरी या फुलावरील औषधांची घाई करतात..व या औषधांनी फुल निघाले असे वाटते व काही ठिकाणी झाडांत काही ताकतच नसते तिथे फुलावरील औषधांचे सगळे ब्रँड वापरून होतात पन ताकतच नसेल तर कुठून फुल येणार
- त्यामुळे आपण या संकल्पना लक्षात घ्याव्यात व त्यानुसार वरील सांगितलेल्या उपाययोजना कराव्यात. उगाचच हे झाले कि ते व ते झाले कि दुसरे असे फुलावरील औषधे मारत बसू नये.



No comments: